पिंपरी / चिंचवड

बनावट इन्शुरन्स काढून कंपनीची सव्वाचार कोटींची फसवणूक : चार संचालकांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

लक्झरी बसेसचे इन्शुरन्स संपले असता त्या बसेस ऐवजी दुचाकीचा इन्शुरन्स काढून लक्झरी बसेसचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. याप्रकरणी चार संचालकांच्या विरोधात सव्वाचार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आकुर्डी येथे घडला आहे.

एस के एस एल टी आणि एस के एस पी एल याचे संचालक महेश खेडकर, राघवेंद्र खेडकर, हेमंत खेडकर, चिंतामणी खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समर्थ विपीनशंकर झा (वय 26, रा. निजामपुरा, जि. वडोदरा, गुजरात) यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस के एस एल टी आणि एस के एस पी एल या कंपनीत फिर्यादी समर्थ झा आणि कोमल शहा यांची 60 टक्के भागीदारी आहे. कंपनीच्या चार संचालकांनी फिर्यादी आणि शहा यांच्या परवानगीशिवाय कंपनीच्या 18 लक्झरी बसेस पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी हळवल्या. बसेसचे इन्शुरन्स संपले असताना लक्झरी बसेस ऐवजी होंडा ऍक्टिवा या दुचाकीचे एचडीएफसी एरगो या इन्शुरन्स कंपनीकडून बनावट इन्शुरन्स काढला. त्याआधारे लक्झरी बसेसचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून फिर्यादी समर्थ झा आणि कोंला शहा यांची तब्बल चार कोटी 23 लाख 23 हजारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button